नेतृत्वगुणांतील असपष्टतेमुळे होतेय काँग्रेसचे नुकसान : शशी थरूर

सकाळ (यिनबझ)
Monday, 29 July 2019

पुढचा अध्यक्ष कोण, यासंदर्भात कोणतीच स्पष्टता नसल्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे, असा घरचा आहेर पक्षाचे नेते आणि खासदार शशी थरूर यांनी दिला.

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे आणि पुढचा अध्यक्ष कोण, यासंदर्भात कोणतीच स्पष्टता नसल्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे, असा घरचा आहेर पक्षाचे नेते आणि खासदार शशी थरूर यांनी दिला. पक्षाने कार्यकारिणीतील सदस्यांसह इतर सर्वच महत्त्वाच्या जागांसाठी निवडणूक घ्यावी, जेणेकरून नवे नेतृत्त्व पुढे येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसने तरुण नेत्याकडे पक्षाचे नेतृत्त्व द्यावे, असे म्हटले होते. त्याला शशी थरूर यांनी समर्थन दिले. तरुण नेत्याला नेतृत्त्व करण्याची संधी दिल्यास ते जास्त स्वागतार्ह आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अध्यक्षपदी कोण असणार, याची स्पष्टता नसल्याने कार्यकर्ते गोंधळलेले आहेत असे ते म्हणाले.

प्रियांका सर्वोत्तम उमेदवार
प्रियांका गांधींमध्ये करिश्‍मा आहे. त्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या सर्वोत्तम उमेदवार ठरतील, असे मत शशी थरूर यांनी व्यक्त केले आहे. पक्षाकडून जेव्हा अधिकृतपणे पुढील अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जाईल. त्या वेळी प्रियांका यांनीही पुढे यावे, अशी इच्छा थरूर यांनी व्यक्त केली; पण हा निर्णय गांधी कुटुंबाने घ्यावा, असेही ते म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News