वंचितला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 July 2019
  • वंचित आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत यावे, अशी आमची इच्छा
  • काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांकडून ६ जुलैपर्यंत अर्ज मागवण्यात आले ​

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत महाजन यांना धारेवर धरले. चव्हाण म्हणाले, की पक्षनेतृत्वाने राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षांसोबत आघाडीला तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात निवडणुकीपूर्वी माजी आमदार इच्छुकांना विश्‍वासात घेऊन निवडणुकीत तरुण चेहरे, महिलांना संधी देण्यासाठी जिल्हानिहाय दौरे सुरू केले आहेत.

काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांकडून ६ जुलैपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमाफीचे अपयश, सत्ताधाऱ्यांच्या आर्थिक गैरव्यवहारासह विविध मुद्द्यांवर प्रचार सभा घेतल्या जाणार आहेत.

वंचितांचा तरी  कुठे लाभ?
वंचित आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत यावे, अशी आमची इच्छा आहे. पण वंचित आघाडीने तो निर्णय घ्यायचा आहे.

वंचित आघाडीअभावी लोकसभा निवडणुकीत ९ ते १० जागांवर काँग्रेसला जसा फटका बसला तसा वंचित आघाडीला तरी कुठे फायदा झाला. याचा त्यांनीही विचार करण्याची गरज आहे.
- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News