काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष? आज होणार निर्णय 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019
  • आत्ता प्रर्यंत काँग्रेस पक्षातर्गंत १९९९ पासून कोणतेही मोठे बदल झालेले नाहीत.
  • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकसभा निवडणुकीतील  पराभवाची जबाबदारी स्वीकारत ते आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष पदावर राहुल गांधी कायम राहणार की नाहीत, याबाबत अजून कोणताही खुलासा झालेला नाही. याच दरम्यान, आज, ए. के. अँटनी यांच्या अध्यक्षतेखाली कोअर गटाची बैठक होणार आहे. यात आगामी संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरविली जाणार आहे. तसेच,लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड आणि राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा होणार असल्याचे समजते. आत्ता प्रर्यंत काँग्रेस पक्षातर्गंत १९९९ पासून कोणतेही मोठे बदल झालेले नाहीत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत ते आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. पराभवावर मंथन करण्यासाठी बोलावलेल्या काँग्रेसच्या याआधीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत त्यांनी आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, पक्षाच्या कार्यकारिणी समितीने तो फेटाळला.

राहुल गांधी काही दिवसांसाठी परदेशात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होत आहे. यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या बदलावर चर्चा होणार आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News