गोव्यातही काँग्रेसमध्ये फूट?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019
  • काँग्रेसचे १५  पैकी १० आमदार भाजपमध्ये सहभागी
  • सहभागी आमदार मध्यरात्री तातडीने दिल्लीला  रवाना

पणजी : गोवा विधानसभेच्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार असतानाच बुधवारी काँग्रेसला खिंडार पडले. काँग्रेसचे १५  पैकी १० आमदार भाजपमध्ये सहभागी झाले.

राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार आहेत. यासंदर्भातील निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. भाजपमध्ये सहभागी झालेले आमदार मध्यरात्री १ वाजता तातडीने दिल्लीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी विधानसभा पोटनिवडणूक निकालाच्या वेळी काँग्रेसचे १० आमदार संपर्कात आहेत, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर तातडीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्याचे खंडन केले होते.काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली ही फूट पडली आहे. काँग्रेसकडे आता पाच आमदार राहिले आहेत. त्यापैकी चार माजी मुख्यमंत्री आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News