काँग्रेसच्या पराभवाला काँग्रेसच जबाबदार : नेत्यांनी दाखवले एकमेकांकडे बोट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019
  • पराभवासाठी काँग्रेस नेत्यांनी धरले एकमेकांना जबाबदार

पाटणा : लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत चर्चेसाठी आलेल्या काँग्रेस नेत्यांनी पराभवासाठी एकमेकांनाच जबाबदार ठरवले. बिहारमधील लोकसभेच्या ४०पैकी फक्त एक जागा काँग्रेसला मिळाली आहे.

या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या सदाकत आश्रमातील मुख्य कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. त्यात नेत्यांनी, काँग्रेसला नऊ जागा मिळणे, हा अपमान असल्याचे सांगत महाआघाडीच्या लहान पक्षांना त्यांची योग्यता नसताना जास्त जागा दिल्या गेल्या, याउलट काँग्रेसला मात्र नऊ जागांवरच समाधान मानावे लागले; तसेच महाआघाडीमध्ये असलेल्या इतर लहान पक्षांची मिळालेली मते ही पक्षाच्या फायद्याची ठरली नाहीत.

त्यातही आपल्याला पराभव पत्करावा लागला, असे आरोप केले. काही नेत्यांच्या मते, काँग्रेसला राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या सावलीतून बाहेर पडण्याची गरज आहे व आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी. असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News