विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला हद्दपार करू : मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019
  • भाजप-शिवसेना युतीच्या २२० जागा निवडून आणायचा आमचा निर्धार

नाशिक : युतीत मतभेद नाही.  ‘अबकी बार २२० पार’ या न्यायाने एकदिलाने काम करून राज्यात भाजप-शिवसेना युतीच्या २२० जागा निवडून आणायचा आमचा निर्धार आहे. भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यकर्त्यांना तशा स्पष्ट सूचनाच आहेत. त्यामुळे राज्यात आगामी मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल, असा दावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी केला.

नाशिक विभागातील वृक्ष लागवडीच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने ते आले होते. पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘शहा यांनी बैठक घेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे युतीच्या उमेदवारांचे काम करावे.’’

राष्ट्रवादी काँग्रेसला शुभेच्छा
मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय जबाबदारीने विरोधी पक्षाचे कामकाज पाहत आहे. त्या पक्षाला आजच्या वर्धापनदिनी मी त्यांना शुभेच्छा देतो. पुढील २५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसने अशाच पद्धतीने जबाबदारीने विरोधी पक्षाचे काम करीत राहावे, या माझ्याकडून त्या पक्षाला शुभेच्छा.

त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांच्यावर टीका केली. ‘ईव्हीएम’बाबत काका-पुतण्यात एकमत झाले, तर ते लोकशाहीसाठी पोषक राहील, अशी टीका त्यांनी केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News