"मुका मोर्चा" म्हणणारेही मराठा आरक्षणाच्या जल्लोषात सामील का ?- सचिन सावंत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 June 2019
  • सचिन सावंत यांचा जुन्या आठवणींना उजाळा
  • टिकात्मक ट्विट करत साधला निशाणा

मुंबई: गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या निकालाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागुन होते. अखेर मराठा समाजाला ‘एसईबीसी’ अंतर्गत दिलेले आरक्षण वैध असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. न्यायालयाच्या या निर्णयाचे मराठा समाजातर्फे राज्यभर जल्लाेष करुन स्वागत करण्यात आले. या निर्णयाचे भाजप आणि शिवसेना आमदारांनीच नव्हे तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील स्वागत केले. मात्र कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. सावंत यांनी "मुका मोर्चा" म्हणणारेही यात सामील का? असं टिकात्मक ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे. एकुणच काय तर जुन्या आठवणींना उजाळा देत सचिन सावंत यांनी  शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

 

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून मराठा समाजाच्या मोर्च्यावर 'मुका मोर्चा' अशी खिल्ली उडवणारे व्यंगचित्र रेखाटण्यातआले होते. या व्यंगचित्रामुळे राज्यभरात मराठा समाजाने सामनाच्या अंकाची होळी केली होती. यामुळे उद्धव ठाकरे यांना मराठा समाजाची माफीही मागावी लागली होती.  या वादावर व्यंगचित्रकार प्रभूदेसाई यांनी जाहीर माफीही मागितली. तसंच सेनेचे नेते सुभाष देसाई यांनीही दिलगिरी व्यक्त केली.

दरम्यान मराठा आरक्षणाचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने गुरुवारी वैध ठरवताच समर्थकांनी न्यायालयाबाहेर जल्लोष केला. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे...’ अशा घोषणांचा गजर, भगवे झेंडे, पेढेवाटप आणि अखेरीस हुतात्मा चौकात जाऊन अभिवादन अशा उत्साही वातावरणात त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News