कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर; 51 उमेदवारांना मिळाली संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 30 September 2019
  • 51 उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. अशी माहिती कॉंगेसच्या ऑफिसिअल ट्विटर हॉडल वरुन प्रसारीत करण्यात आली.

मुंबई: कुणाला मिळणार संधी, कुणाचा नंबर कट होणार अशी धाकधूक कार्यकर्ते आणि उमेदवार यांना लागली असताना कॉंग्रेस पक्षाने पहिली यादी शनिवारी जाहीर केली. यात 51 उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. अशी माहिती कॉंगेसच्या ऑफिसिअल ट्विटर हॉडल वरुन प्रसारीत करण्यात आली.
 

या यादीनुसार पुण्यातून कँटोन्मेंट मतदारसंघातून माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, भोरमधून संग्राम थोपटे तर पुरंदर मधून संजय जगताप, करवीर मतदारसंघातून माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील व कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून ऋतुराज पाटील यांचा समावेश आहे. तर भोकरमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, संगमनेरमधून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, लातूर शहरमधून अमित देशमुख, सोलापूर शहर मध्यमधून प्रणिती शिंदे यांचीही नावे जाहीर करण्यात आली आहेत.

महत्त्वाचं म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव यादीत नाही. त्यामुळे साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणूकीसाठी उमेदवार म्हणून पृथ्वीराज चव्हाण याचं नाव सध्या चर्चेत आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News