राज्यात महाशिवआघाडीचं सरकार निश्चीत; आदित्य ठाकरे होणार मुख्यमंत्री !

सकाळ वृतसंस्था (यिनबझ)
Monday, 11 November 2019

जर काँग्रेस शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देणार असेल तर त्यांनी राज्य सरकार पुढील पाच वर्षासाठी स्थिर राहील याची हमी द्यावी.

मुंबई - सोनिया गांधीनी शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. एकनाथ शिंदा आणि आदित्य ठाकरे राजभवनात दाखल झाले आहे. ते राज्यपालांना भेटून सत्तास्थापऩेची दावा करणार आहेत. मात्र राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार हे निश्चीत आहे. राज्यातील काँग्रेस आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा द्यावा असे मत आधीच व्यक्त केले होते. विस वर्षानंतर शिवसेनेचे सरकार येत बाळासाहेब ठाकरे याचं स्वप्न पुर्ण होत आहे. आदित्य ठाकरे यांनी स्वत: सत्तास्थापनेसाठी राज्यपालांची भेट घेतल्यानं आदित्यच मुख्यमंत्री होतील अशी जोरदार चर्चा आहे.

जर काँग्रेस शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देणार असेल तर त्यांनी राज्य सरकार पुढील पाच वर्षासाठी स्थिर राहील याची हमी द्यावी. तरच लोक काँग्रेसवर विश्वास ठेवतील, असा सल्ला माजी पंतप्रधान एच.डी देवेगौडा यांनी दिला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला महाराष्ट्रात स्थान दिले. लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी स्वत: बाळासाहेबांकडे केले होते. त्यांनी बाळासाहेबांकडे जागेची मागणी केली होती. आता भाजपने मर्यादा ओलांडली आहे. बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी आता भूमिका घेतली आहे आणि ते भाजपला धडा शिकवतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे भाजपला खाली खेचण्याची संधी आहे, असे देवेगौडा म्हणाले

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News