लोकशाही मूल्यांसाठीचा संघर्ष नव्या पिढीला प्रेरणादायी - आनंद पांडे

समीर मगरे
Sunday, 30 June 2019

आणीबाणीतील लोकशाही मूल्यांवर घालण्यात आलेला घाला थोपवून धरण्यासाठी अनेकांनी संघर्ष केला. हा संघर्ष करताना त्यांच्यासमोर आपला देश, त्यातील समाज आणि या समाजाची स्वातंत्र्य समता हे मूल्ये डोळ्यापुढे होती. या मूल्यांसाठी प्रसंगी घरादारावर तुळशीपत्र ठेवून, सर्व प्रकारच्या हालअपेष्टा सोसून तुरुंगवास पत्करून जो संघर्ष करण्यात आला, त्यामागे केवळ कर्तव्यबुद्धी आणि लोकशाही मूल्यांसाठी काही करण्याची तळमळ होती. आज शासन या आणिबाणीतील संघर्षनायकांना त्याचप्रमाणे संघर्षनायिकांना सन्मानपत्र देऊन, पेन्शन मंजूर करून कृतज्ञता व्यक्त करत आहे.

आणीबाणीतील लोकशाही मूल्यांवर घालण्यात आलेला घाला थोपवून धरण्यासाठी अनेकांनी संघर्ष केला. हा संघर्ष करताना त्यांच्यासमोर आपला देश, त्यातील समाज आणि या समाजाची स्वातंत्र्य समता हे मूल्ये डोळ्यापुढे होती. या मूल्यांसाठी प्रसंगी घरादारावर तुळशीपत्र ठेवून, सर्व प्रकारच्या हालअपेष्टा सोसून तुरुंगवास पत्करून जो संघर्ष करण्यात आला, त्यामागे केवळ कर्तव्यबुद्धी आणि लोकशाही मूल्यांसाठी काही करण्याची तळमळ होती. आज शासन या आणिबाणीतील संघर्षनायकांना त्याचप्रमाणे संघर्षनायिकांना सन्मानपत्र देऊन, पेन्शन मंजूर करून कृतज्ञता व्यक्त करत आहे. अर्थात अशा प्रकारचा कोणताही मोबदला मिळावा म्हणून काही त्यावेळच्या नामअनाम संघर्षवीरांनी आपला जीव धोक्यात घातला नव्हता. त्यामुळेच त्यांनी केलेले हे कार्य नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे, असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह आनंद पांडे यांनी येथे व्यक्त केले.

स्थानिक भारतीय जनता पार्टी या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आणिबाणी स्मरणदिनी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अशोक गिरी उपस्थित होते. भारतमाता पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाल्यानंतर उपस्थित सर्व मीसाबंदींचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी राजेंद्र डांगे यांनी सर्व मीसाबंदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून विद्यमान सरकार करीत असलेल्या सन्मानाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन मधुकरराव रानडे यांनी केले. मधुभाऊ देशपांडे, पांडुरंग झिंजुर्डे यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या कार्यक्रमास यवतमाळ नगरातील मीसाबंदी व त्यांचे वारस उपस्थित होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News