बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019
  • 'कॉम्प्युटर सिस्टिम हार्डवेअर असेम्ब्लिंग' (संगणकाच्या विविध भागांची जोडणी) या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
  • अभिजित गोमासे यांनी कॉम्प्युटर हार्डवेअर डीलग, संगणकातील पेरीङ्किरल्स या उपकरणाची ओळख आणि असेम्ब्लिंग या विषयावर विस्तृत माहिती दिली.

वर्धा: वर्धा येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी शाखेतर्फे विभागातील तिसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी 'कॉम्प्युटर सिस्टिम हार्डवेअर असेम्ब्लिंग' (संगणकाच्या विविध भागांची जोडणी) या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अभिजित गोमासे आणि त्यांचे सहकारी या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. 

यावेळी व्यासपीठावर संगणक विभागप्रमुख डॉ. एस.डब्ल्यू.माहोड, समन्वयक प्रा.ए.एन.ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अभिजित गोमासे यांनी कॉम्प्युटर हार्डवेअर डीलग, संगणकातील पेरीङ्किरल्स या उपकरणाची ओळख आणि असेम्ब्लिंग या विषयावर विस्तृत माहिती दिली. तसेच संगणकातील सर्वच तांत्रिक बाबी समजून सांगताना कॉम्पुटर प्रोसेसिंग युनिट, ‘मशिन माकनिज', पॉवर सप्लाय रिक्वायरमेन्ट, इनपुट अ‍ॅण्ड आउटपुट पाटस, रॅम विषयी संपूर्ण माहिती, बेसिक ट्रबलशूटिंग, इंटरफेस काडस, एक्स्टर्नल कनेक्शन्स, केबल अ‍ॅण्ड अदर डीव्हाईसेस या सर्व विषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. 

सदर कार्यशाळेमुळे विद्यार्थ्याना  संगणकीय हार्डवेअर संदर्भात संपूर्ण माहिती प्रात्यक्षिकासह उपलब्ध झाली. त्यामुळे विद्यार्थ्याना संगणकाची कार्यपद्धती कशी असते, व संगणकात बिघाड आल्यास कशाप्रकारे त्यात दुरुस्ती केल्या जाऊ शकते, याचे प्रत्यक्ष ज्ञान तज्ज्ञांच्या उपस्थितीत मीळाले. संगणकाच्या आतील यंत्रसामग्रीची देखभाल आणि दुरुस्ती, संगणकाची स्मरणशक्ती माहिती साठवण्याची क्षमता (स्टोअरेज), संगणकाच्या विविध भागांची जोडणी (असेम्ब्लिंग), संगणक बिघडण्यासंदर्भातील विविध समस्या आणि त्यांचे निराकरण या सर्व विषयावर या कार्यशाळेत संवादात्मक चर्चा झाली. त्यामुळे विद्यार्थ्यात एक वेगळा आत्मविश्वास पाहायला मिळाला. 

कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.ए.एन.ठाकरे तसेच प्रा.पी.ए.जालान, प्रा.एस.व्ही.राऊत तसेच विभागातील इतर प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यशाळेसाठी सहकार्य केले. कार्यशाळेला विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News