नवी दिल्लीतून आले आदेश, ‘वैद्यकीय पदव्युत्तर’चे प्रवेश १४ जूनपूर्वीच पूर्ण करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019
  • वैद्यकीय’च्या प्रवेश प्रक्रियेची प्रवेशाची अंतिम फेरी १४ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

नवी दिल्ली - वैद्यकीयच्या पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले. तसेच, यंदाच्या ‘वैद्यकीय’च्या प्रवेश प्रक्रियेची प्रवेशाची अंतिम फेरी १४ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले आहेत. 

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना (ईडब्ल्यूएस) वैद्यकीयच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी दहा टक्के आरक्षण देण्याच्या अध्यादेशाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतरही प्रवेशप्रक्रिया सुरू न केल्याबद्दल खंडपीठाने सरकारला तिखट शब्दांत खडसावले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश इंदू मल्होत्रा आणि न्या. एम. आर. शाह यांच्या सुटीकालीन खंडपीठापुढे आज या प्रकरणाची सुनावणी झाली. वैद्यकीयच्या पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात राज्यातील वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करावी, प्रवेशाची ही अंतिम फेरी असेल त्यात नमूद करावे, असे आदेश खंडपीठाने दिले.

वैद्यकीयच्या पदव्युत्तर पदवीच्या २०१९-२० साठीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात या पुढे कुठल्याही याचिका किंवा अर्ज दाखल करता येणार नाही, असे स्पष्ट केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News