ईव्हीएमबाबत पटोलेंची आयोगाकडे तक्रार : निवडणूक अधिकाऱ्यांचा पक्षपाती पणा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019
  • निवडणूक अधिकाऱ्यांनीही पक्षपाती भूमिका घेतल्याची तक्रार
  • सुरवातीला स्ट्राँग रूममधील कॅमेरे तीन दिवसांपासून बंद होते​

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार करण्यात आला असून, निवडणूक अधिकाऱ्यांनीही पक्षपाती भूमिका घेतल्याची तक्रार काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी मुख्य निवडणूक आयुक्‍तांकडे केली आहे.  

नागपूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीदरम्यान जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका पक्षपातीपणाची होती. त्यांनी नियमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबविली नाही, असा थेट आरोप पटोले यांनी तक्रारीत केला आहे. पटोलेंच्या तक्रारीनुसार, सुरवातीला स्ट्राँग रूममधील कॅमेरे तीन दिवसांपासून बंद होते. तक्रारीनंतर  कॅमेरे सुरू आहेत. फक्त मॉनिटर बंद असल्याचा दावा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी करून या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News