स्पर्धा परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांना लाभदायक : संजय धुमाळ

विशालराज पाटील
Monday, 29 July 2019
  • फत्त्यापूरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

सातारा : "फत्त्यापूर" (ता. सातारा) येथील भैरवनाथ स्पर्धा परीक्षा केंद्र हे भागातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी निश्‍चितच लाभदायक ठरेल,'' असा विश्वास सातारा तालुका गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी व्यक्त केला. 

धुमाळ म्हणाले, "ग्रामीण भागात सुरू केलेले असे मार्गदर्शन केंद्र ही निश्‍चितच अभिमानाची बाब आहे. याचा लाभ केवळ फत्त्यापुरातीलच नव्हे, तर परिसरातील इतर गावांतील गुणवत्ता सिद्ध विद्यार्थ्यांनी जरूर घ्यावा. भविष्यकाळात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा व उच्च ध्येय या बाबींची गरज असल्याने यांसारख्या मार्गदर्शन केंद्राचा लाभ होतो. त्यातूनच एक जबाबदार नागरिक तयार होतो.'' 

फत्त्यापूर विकास सेवा सोसायटीतर्फे सुरू केलेल्या केंद्रामार्फत शैक्षणिक वर्ष 2018 व 19 यात मंथन शिष्यवृत्ती, नवोदय निवड परीक्षा, पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, तसेच दहावी व बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. (कै.) दिनकर बाळाजी घाडगे ट्रस्टतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप धुमाळ यांच्या हस्ते केले. 

यावेळी नितीन घाडगे, मनोहर घाडगे, एम. वाय. घाडगे, उत्तमराव घाडगे, दत्तात्रय पवार, शंकर घाडगे, विनोद घाडगे, तानाजी घाडगे, आनंदीबाई घाडगे, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. अशोक घाडगे प्रास्ताविक यांनी केले. तुषार घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. धनाजी कातांगळे यांनी आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News