किमान समान कार्यक्रम म्हणजे कय?

यिनबझ टीम
Wednesday, 13 November 2019

मुंबई - महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाला 14 व्या विधानसभेसाठी बहुमत सिध्द न करता आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु करण्यात आली आहे. ही राष्ट्रपती राजवट जरी सुरू करण्यात आली असली तरी राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या चर्चा सुरूच आहेत, हे मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व बैठकांवर आणि पत्रकार परिषदेच्या आधारे समोर आले.

मुंबई - महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाला 14 व्या विधानसभेसाठी बहुमत सिध्द न करता आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु करण्यात आली आहे. ही राष्ट्रपती राजवट जरी सुरू करण्यात आली असली तरी राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या चर्चा सुरूच आहेत, हे मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व बैठकांवर आणि पत्रकार परिषदेच्या आधारे समोर आले.

यांच्यात झालेल्या चर्चांच्या आधारे सत्ता स्थापन करताना किमान समान कार्यक्रम Common minimum programme चा वापर करण्यात येईल असे दिग्गज नेत्यांनी म्हटले आहे. आता हा किमान समान कार्यक्रम म्हणजे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू,

सत्ता स्थापनेसाठी दोन विरुध्द पक्ष एकत्र येत असतील तर त्यांच्यात काही तरतुदींना घेऊन अहवाल ठरवला जातो. त्याच्या अंतर्गत असलेले अनेक हेवेदावे बाजूला करून ठरावीक मुद्द्यांना घेऊन सरकार स्थापन करावे लागते. त्यालाच किमान समान कार्यक्रम म्हटले जाते.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आदारित किमान समान कार्यक्रम म्हणजे काय?
वेगवेगळ्या भुमिकेने पुढे येणारे अनेक राजकिय मुद्दे बाजूला ठेवून सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षांनी आपले वाद बाजूला ठेवून एकत्र यावे, हीच संकल्पना म्हणजेच किमान समान कार्यक्रम असं म्हटलं जातं. निवडणूकीच्या आधी सगळ्या पक्षांनी आपला जाहीरनामा सादर केला होता, त्यापैकी शिवसेना, आघाडीच्या जाहीरनाम्यातल्या अनेक गोष्टी समान होत्या. राम मंदिराचा मुद्दा, NRC, कलम 370 अशा काही मुद्दांमध्ये आघाडी आणि शिवसेना यांच्यात फरक आहे. त्यामुळे हे मुद्दे बाजूला ठेवून शेती, भुमिपुत्रांना आरक्षण, स्थानिकांना आरक्षण असे काही मुद्दे हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकच असल्याने त्या तत्वांना घेऊन पुढे जात राहाणे गरजेचे असेल, या ठरलेल्या मसुद्याला किमान समान कार्यक्रम म्हणजेच Common minimum programme असे म्हटले जाते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News