मुंबई पालिकेच्या आयुक्तांची आर. जे. मलिष्का पुढे शरणागती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019
  • मुंबई​ महापालिकेच्या कामकाजावर टीका करणाऱ्या आरजे मलिष्काचा पालिकेने चांगलाच धसका घेतल्याचे दिसत आहे

मुंबई : ‘मुंबई.. तुला बीएमसीवर भरोसा नाय काय..?’ आणि ‘मुंबई गेली खड्ड्यात...’ या गाण्यातून महापालिकेच्या कामकाजावर टीका करणाऱ्या आरजे मलिष्काचा पालिकेने चांगलाच धसका घेतल्याचे दिसत आहे. गुरुवारी (ता. २०) पालिकेच्या वरळीतील पम्पिंग स्टेशन आणि मुख्यालयातील आपत्कालीन विभागाला भेट देणाऱ्या आर. जे. मलिष्काला खुद्द पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासह तीन अतिरिक्त आयुक्तांनी उपस्थित राहून माहिती दिल्याने पालिका अधिकाऱ्यांनी मालिष्कासमोर  शरणागती पत्करल्याचे स्पष्ट झाले.

मालिष्कासाठी पायघड्या घालणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत शिवसेना काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन वर्षापूर्वी आर. जे. मलिष्काने खासगी एफएमवर गायलेल्या गाण्यातून मुंबई महापालिकेवर टीका केली होती. यावरून पालिकेतील सत्ताधारी शिवसेना व मालिष्कामध्ये चांगलीच जुंपली होती.

या गाण्याला शिवसेनेनेही ‘मलिष्का तुला मुंबईवर भरोसा नाय काय’ असे गाणे तयार करून प्रत्तुत्तर दिले होते; मात्र मलिष्काने त्यानंतर गेल्यावर्षीही नव्याने गाणे म्हणत पुन्हा टीका केली. मलिष्का वारंवार पालिकेच्या कामकाजावर टीका करीत असल्याने जनमानसात चुकीचा संदेश जातो. त्यामुळे पालिकेच्या चांगल्या कामांची माहिती समोर यावी यासाठी मलिष्काला कामकाजाची माहिती देण्यात आली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News