कला, विज्ञान शाखेला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 13 July 2019
  • अकरावीच्या पहिल्या फेरीत ४८ हजार ७०१ विद्यार्थ्यांना प्रवेश
  • मराठी आणि इंग्रजी माध्यम मिळून या शाखेला २१ हजार ६८३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.​

पुणे - अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत ४८ हजार ७०१ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय देण्यात आले आहे. या फेरीत विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती वाणिज्य शाखेला दिली. मराठी आणि इंग्रजी माध्यम मिळून या शाखेला २१ हजार ६८३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.

पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने शुक्रवारी जाहीर केली. त्यानुसार मिळालेल्या महाविद्यालयात १३ आणि १५ जुलै रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत, तर १६ जुलै रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित करणे बंधनकारक आहे. ज्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे, त्या विद्यार्थ्यांनी मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे बंधनकारक आहे. जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत, त्यांची नावे पुढील नियमित फेऱ्यांसाठी प्रतिबंधित (ब्लॉक) केली जाणार आहेत.

प्रवेश मान्य नसल्यास
विद्यार्थ्यांना पसंतीक्रम दोन ते दहा या पैकी कोणतेही महाविद्यालय मिळाले असेल, तर ते प्रवेश घेऊ शकतात. त्यासाठी प्रवेशाच्या संकेतस्थळावर जाऊन स्टुडंट लॉगिनमध्ये ‘प्रोसिड’ या बटणावर क्‍लिक करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयात 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News