विनोदी रितेश आता ॲक्‍शनपट चित्रपटात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019

‘बागी ३’ या चित्रपटात रितेश देशमुख टायगरच्या भावाची भूमिका साकारणार आहे.

विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा रितेश देशमुख आता ॲक्‍शनपट चित्रपटात दिसणार आहे.

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘बागी ३’ चित्रपटात त्याची एण्ट्री झाली आहे. या चित्रपटात तो टायगरच्या भावाची भूमिका साकारणार आहे.

‘रितेशबरोबरचा हा माझा सहावा चित्रपट आहे. ‘बागी ३’ मध्ये रितेश महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे,’ असे निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी म्हटले आहे. ‘बागी ३’मध्ये रितेश कोणत्या नव्या लूकमध्ये दिसतो हे पाहणं औत्सुक्‍याचे ठरेल. 
 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News