किरण राव यांचे दिग्दर्शनात कमबॅक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019

पुन्हा एकदा किरण राव दिग्दर्शनाकडे वळली आहे. फेसबुक इंडियासाठी किरणने दहा-दहा सेकंदाचे सामाजिक संदेश देणारे दोन चित्रपट बनवले आहेत.

मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमिर खानची पत्नी किरण रावने जवळपास नऊ वर्षांपूर्वी ‘धोबी घाट’ नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला.

आता पुन्हा एकदा ती दिग्दर्शनाकडे वळली आहे. फेसबुक इंडियासाठी किरणने दहा-दहा सेकंदाचे सामाजिक संदेश देणारे दोन चित्रपट बनवले आहेत. ‘फेसबुक थंबस्टॉपर’ या फेसबुक पेजवर हे दोन व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत.

किरण यांनी सांगितले की, ‘एक चित्रपट दिग्दर्शिका म्हणून हे दोन चित्रपट बनवताना मला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. शिवाय मला दिग्दर्शन क्षेत्र आवडतं आणि यानिमित्ताने पुन्हा मला माझं आवडत काम करायला मिळालं.’

 

शिवाय ‘फेसबुक थंबस्टॉपर’ने ‘थंबस्टॉपर चॅलेंज’ नावाचा नवा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामध्ये इच्छुकांना त्यांचे सामाजिक संदेश देणारे व्हिडीओ सादर करण्याची संधी मिळणार आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News