'चला हवा येऊ द्या' शोमधील "हा" कलाकार अडकला लग्नबेडीत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्यामध्ये आपल्या विनोदी अंदाजाने धमाल उडवून देणारा विनोदवीर नुकताच लग्नबेडीत अडकला आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्यामध्ये आपल्या विनोदी अंदाजाने धमाल उडवून देणारा विनोदवीर अंकुर वाढवे नुकताच लग्नबेडीत अडकला आहे. २८ जूनला अंकुरचा विवाह पार पडला. त्याने यवतमाळमध्ये कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर आता विदर्भातील पुसद गावात स्वागत समारंभ रविवारी (ता.30) पार पडणार आहे. 

अकुंर वाढवेचा जानेवारी महिन्यात साखरपुडा पार पडला होता. साखरपुडा झाल्याचे त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सांगितले होते. त्यानंतर आता यवतमाळ येथे त्याचे लग्न पार पडल्याचे समोर आले आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Now I'm engaged sorry girls who miss that opportunity 

A post shared by Ankur Vitthalrao Wadhave (@ankur_wadhave_official) on

अंकुर अभिनेत्यासोबत उत्तम कवीदेखील आहे. त्याच्या पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी या कविता संग्रहाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Full Energy episode with energetic actor

A post shared by Ankur Vitthalrao Wadhave (@ankur_wadhave_official) on

त्याने करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस, आम्ही सारे फर्स्ट क्लास, सायलेन्स व कन्हैया या नाटकात काम केले आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Every morning is special

A post shared by Ankur Vitthalrao Wadhave (@ankur_wadhave_official) on

तसेच जलसा चित्रपटातही त्याने काम केले आहे. मात्र चला हवा येऊ द्या या शोमधील छोटूच्या भूमिकेतून तो घराघरात पोहचला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News