कॉलेजवर वट... तर विषय कट... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019

कोल्हापूर : ‘ज्याच्या हातात काठी त्याची म्हैस’, असाच प्रकार शहरातील फाळकूटदादांचा कॉलेजच्या बाबतीत आहे. कॉलेजवर ज्याचा वट, तोच भागातला दादा. त्याचेच त्या परिसरावर वर्चस्व हे समीकरणच बनले आहे. कॉलेजचा ट्रॅडिशनल डे, स्नेहसंमेलन, वेगवेगळे डे या निमित्ताने आपले वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न हे फाळकूटदादा व त्यांचे बगलबच्चे करतात. याच वर्चस्ववादातून हाणामाऱ्या होतात. त्यामुळे कॉलेज परिसर अशांत बनतो आहे. 

‘आमचा नाद कोणी केला तर त्याचा विषय कट झाला पाहिजे’, असे वर्चस्व महाविद्यालयावर करण्यासाठी फाळकूटदादांत स्पर्धा सुरू आहे. महाविद्यालय परिसरातील टपऱ्या, कोपऱ्या कोपऱ्यांवर फाळकूटदादांचा बगलबच्यांबरोबर ठिय्या असतो. साधा धक्का लागण्याच्या कारणावरून असे दादा मंडळी व त्यांचे बगलबच्चे एखाद्याला तुडविल्याशिवाय शांत बसत नाहीत. अशा प्रकारातून ते चर्चेत येतात. मग त्यांच्या नादाला कोण लागत नाही. भीतीपोटी सगळेच सलाम ठोकतात. तसाच प्रयत्न काही महाविद्यालयांत फाळकूटदादांकडून सुरू आहे. विद्यार्थ्यांचा अगर बगलबच्च्यांचा वाढदिवस असू द्या, त्याचा महाविद्यालयाच्या परिसरात डिजिटल फलक फाळकूटदादांच्या छायाचित्रासह झळकलाच पाहिजे, अशी त्यांची अघोषित सक्ती असते. मिरविण्याच्या नादात काही विद्यार्थी बळी पडून वाढदिवसाचे डिजिटल फलक लावतात. अशातून फाळकूटदादा नावारूपास येतात. त्यांच्यासमोर महाविद्यालयाचे प्रशासनही नकळत झुकते.  ऐरवी काही महाविद्यालयांत ओळखपत्राशिवाय सामान्य विद्यार्थ्याला प्रवेश मिळत नाही. 

मात्र, असे फाळकूटदादा व त्यांचे बगलबच्चे महाविद्यालयात मोटारसायकल, मोटारीतून थेट प्रवेश करतात. मोटारीत सिस्टीम लावून धिंगाणाही करतात; पण त्यांना अडविण्याचे धाडस प्रशासनाकडे नसते. वट तयार झाला, की येथील ट्रॅडिशनल डे, स्नेहसंमेलन असो की वेगवेगळे डे, ते कधी व कसे साजरे करायचे. त्यात सिस्टीमसह कशी मिरवणूक काढायची. मिरवणुकीत कोणत्या तालीम मंडळाच्या झेंड्याचा वापर करायचा, असे सारे काही ठरविण्याची मक्तेदारी फाळकूटदादांचीच, असे चित्र आहे.  वर्चस्ववादातून वाढतो संघर्ष; हाणामाऱ्या नित्याच्या, ‘ट्रॅडिशनल डे’वर मक्तेदारी 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News