ए.सी. पाटील इंजिनिरिंग कॉलेज कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 13 July 2019
  • ए. सी. पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालयातील प्रकार
  • जवळपास २०० कर्मचाऱ्यांना नऊ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे; तर काहींनी कुटुंबाच्या उदरनिर्वाह होत नसल्यामुळे नोकरी सोडल्याची माहिती मिळाली.

खारघर -  ए. सी. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिरिंगमध्ये काम करणाऱ्या जवळपास २०० कर्मचाऱ्यांना नऊ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे; तर काहींनी कुटुंबाच्या उदरनिर्वाह होत नसल्यामुळे नोकरी सोडल्याची माहिती मिळाली. याशिवाय महाविद्यालयाच्या नवीन शैक्षणिक वर्षात काही शाखा बंद केल्यामुळे विद्यार्थीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

खारघरमध्ये असलेल्या ए.सी. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या विविध शाखा असून एक नावाजलेली संस्था म्हणून कॉलेजची ओळख आहे; मात्र संस्थेची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने महाविद्यालयात लिपिक, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, स्वीपर, सुरक्षा रक्षक तसेच कार्यालयीन विभागात काम करणाऱ्या जवळपास दोनशे कामगारांना गेल्या नऊ महिन्यांपासून पगार मिळाले नाहीत. पगार मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, कौटुंबिक खर्च करणे कठीण झाल्याने काहींनी नोकरी सोडून मिळेल त्या ठिकाणी काम शोधले असल्याचे एका कर्मचाऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

महाविद्यालयाचे ट्रस्टी हे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून पराभूत झाल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. तसेच नव्या शैक्षणिक वर्षात कॉम्प्युटर इंजिनिअर, इलेक्‍ट्रॉनिक आणि टेलिकॉम इंजिनिअर, एमसीए विभाग अशा काही शाखाही बंद केल्याने विद्यार्थीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. नावाजलेल्या संस्थेची अशी अवस्था झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.

रखडलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार लवकरच केले जातील. शाखा बंद केल्यापासून द्वितीय आणि तृतीय वर्षात विविध शाखेत असलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू आहेत.
- प्रा. व्ही. एन. पवार, ए. सी. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News