कॉलेज कट्टा (कविता)

अमोल लाले (मुक्तछंदी)
Wednesday, 24 July 2019

कॉलेजमध्ये एक छान कट्टा असतो,
जिथे प्रेमाच्या आणा भाका घेतल्या जातात,
कोवळ्या वयातच,
भविष्यातली अनेक दिवास्वप्न 
रंगवली जातात.

एकाच चहाच्या कपात 
दोन चहाची कप 
बनवली जातात 
हातात कवडी नसताना,
लाखोंच्या बंगलोची
स्वप्न सजवली जातात.

अनेकदा कॉलेजातल्या कोपऱ्यांमधल्या जागा,
लैला मजनुसाठी फेव्हरेट असतात,
कुणाचा पत्ता लागला नाही तर,
याच जागेचे पुरावे 
बिनधास्तपणे दिले जातात.

कॉलेजमध्ये एक छान कट्टा असतो,
जिथे प्रेमाच्या आणा भाका घेतल्या जातात,
कोवळ्या वयातच,
भविष्यातली अनेक दिवास्वप्न 
रंगवली जातात.

एकाच चहाच्या कपात 
दोन चहाची कप 
बनवली जातात 
हातात कवडी नसताना,
लाखोंच्या बंगलोची
स्वप्न सजवली जातात.

अनेकदा कॉलेजातल्या कोपऱ्यांमधल्या जागा,
लैला मजनुसाठी फेव्हरेट असतात,
कुणाचा पत्ता लागला नाही तर,
याच जागेचे पुरावे 
बिनधास्तपणे दिले जातात.

कॉलेजातल्या अभ्यासासोबतच 
अनेक गोष्टी घडत असतात,
आठवणींच्या कॅमेरात 
त्या आपोआप टिपल्या जातात.

कधी कुणाशी राग, द्वेष, हेवे-दावे,
तर कुणाची नावं कुणाशीही 
आपोआप जोडली जातात,
हे कॉलेज असतंच असं,
इथे प्रत्येक गोष्ट इव्हेंट बनत जाते.

फ्रेंडशिप-डे ला तर 
अगदीच लग्नसराई सारखी बहर येते,
इथे फेब्रुवारीतला प्रत्येक दिवस 
आयुष्यातला मौल्यवान दिवस म्हणून प्रत्येकजण जगत असतो 
प्रेमाच्या पलीकडे जाऊन 
बरंच काही घडवत असतो.

कॉलेजातलं प्रत्येक लेक्चर म्हणजे 
वेळखाऊ बोर करणारी वाटतात
बऱ्याचदा हिरोईन सारख्या दिसणाऱ्या मॅडमच्या लेक्चरची 
मुलं मात्र जीव लावून वाट पाहतात.
तिच्या असलेल्या फिगर वर 
टक लावून बघत राहतात.

शेवटी तरणी बांड पोर म्हटलं की असं काहीतरी करणारच,
पोरींकडे नाहीतरी मॅडम कडे वाकड्या नजरेनं बाघणारचं.

हे वयच वेड असतं 
असं कुणीतरी म्हटलंय 
उक्तींप्रमाणे मुलं मात्र थोडं तरी तस करणारच.

कॉलेजचे  दिवस सरत जातात 
मैत्री घट्ट बनू लागते,
आठवणींच्या हींदोळ्यावर
आठवण मात्र घट्ट बसत जाते...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News