परीक्षा केंद्रात सामूहिक कॉपी, 321 विद्यार्थ्यांची चौकशी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 June 2019

राज्य शिक्षण मंडळातर्फे यंदा एक ते 22 मार्चदरम्यान माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली होती.

औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत गोंदेगाव (ता. सोयगाव) येथील सरस्वती भुवन शाळेच्या परीक्षा केंद्रात सामूहिक कॉपीची घटना घडली होती. या संबंधी शुक्रवारपासून (ता. 14) बोर्डात विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. तीन दिवसांत 321 विद्यार्थ्यांची चौकशी होणार असून, पुढच्या आठवड्यात शुक्रवारी (ता. 21) याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे बोर्डातर्फे सांगण्यात आले. 

राज्य शिक्षण मंडळातर्फे यंदा एक ते 22 मार्चदरम्यान माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली होती. गणित भाग-एक या विषयाच्या परीक्षेच्या वेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व औरंगाबाद जिल्हा परिषद यांच्या भरारी पथकाने केंद्रास भेट दिली असता तेथील 13 वर्गखोल्यांमध्ये उत्तरपत्रिका लिहित असलेले 321 विद्यार्थी सामुदायिक कॉपी करीत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे भरारी पथकामार्फत 13 पर्यवेक्षक, दोन कर्मचारी व केंद्र संचालक अशा 16 जणांवर कार्यवाही करून चौकशी समिती स्थापन केली होती. याबाबत स. भु. संस्थेला दोषींवर कार्यवाही करण्याची सूचना बोर्डामार्फत करण्यात आली होती. गैरप्रकारात सहभागी असलेल्या पर्यवेक्षकांची विभागीय मंडळातर्फे चौकशी पूर्ण झालेली आहे. याबाबतचा अहवाल बोर्डाला सादर करण्यात आला आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News