मनातील पाऊस

डॉ. संदीप एकनाथ क्षीरसागर, सातारा
Monday, 8 July 2019

फुलपाखरू बनुन चिंब पावसात भिजावे... 
भिजलेल्या पंखांना बळ उधाणाचे यावे... 

मन... 
फुलपाखरू बनुन चिंब पावसात भिजावे... 
भिजलेल्या पंखांना बळ उधाणाचे यावे... 

फुलातील गंध असा उधळीत जावे... 
उधळलेल्या गंधाने अंकुर बनुनी पुन्हा मातीत रूजावे... 

न थांबणाऱ्या काळाने थोड तरी थांबावे.... 
आनंदाच्या सागरात मनसोक्त डुंबावे...  

या थांबलेल्या क्षणाला डोळ्यात साठवून घ्यावे.... 
मन...फुलपाखरू बनुन चिंब पावसात भिजावे...

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News