चाहत्यांसाठी शीतलीचा मेसेज; इंस्टाग्रामवर केला फोटो शेअर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 June 2019
  • या मालिकेने निरोप घेतला असून त्याजागी मिसेस मुख्यमंत्री ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

मुंबई : झी मराठीवरील प्रसिद्ध "मालिका लागिरं झालं जी" हिने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेचा शेवट हा गोड दाखविण्यात आला. आज्या म्हणजेच अजिंक्य आणि शीतली यांच्यासह त्यांच्या त्यांच्या गोंडस मुलाला देखील शेवटच्या भागात दाखविण्यात आलं. प्रेक्षकांनी देखील या भागाला भरभरून प्रतिसाद दिला. 

शीतलीने देखील आपल्या चाहत्यांसाठी एक मेसेज शेअर केला आहे. शीतली म्हणजेच शिवानी बावकरने तिचा सहकारी आज्या म्हणजेच नितीशसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. 

 

निरोप घेतोय पण तुमच्या काळजाच्या कोपऱ्यात नेहमीच राहू  #lagirajhalaji #ajyashitli A big big thanks to @zeemarathiofficial, the entire cast and crew of Vajra Productions, @harish_shirke2, @shwetashinde_official, @padmashinde & @tejpalwagh for believing in us. Most importantly thank you to the audiences for loving us soooo much ‌लागिरं लागिरं झालं जी... 

अशा आशयाचा मेसेज तिने चाहत्यांसाठी दिला आहे. या मालिकेने निरोप घेतला असून त्याजागी मिसेस मुख्यमंत्री ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News