मुंबईतील सर्व जागा जिंकण्याचा मुख्यमंत्र्यांना विश्वास

सकाळ (यिनबझ)
Saturday, 20 July 2019

मुंबई : मुंबईने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील छत्तीसच्या छत्तीस जागा जिंकून दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे नवनियुक्‍त अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्‍त केला.

भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील, तर मुंबई भाजप अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांची नुकतीच नियुक्‍ती जाहीर झाली. दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात मंगलप्रभात लोढा यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मंत्री, आमदार तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

मंगलप्रभात लोढा यांचा या वेळी सत्कारही करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धर्मराज युधिष्ठिराची नीती आहेच, पण त्याचसोबत पक्ष तसेच सरकारला संकटातून बाहेर काढण्यासाठी श्रीकृष्णाचे चातुर्यही आहे, अशी स्तुती लोढा यांनी केली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News