राष्ट्रवादीचे घड्याळ दहा वाजून दहा मिनिटांनी कायमस्वरुपी बंद पडेल - पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 14 October 2019

येत्या २४ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ दहा वाजून दहा मिनिटांनी कायमस्वरुपी बंद पडेल, असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी येथे व्यक्त केला.  स्वत:च्या जिल्ह्यात बारामती, आंबेगाव वगळता एकही जागा जिंकता आली नसताना बीडची धास्ती कशासाठी घेता, असा उपरोधिक टोला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी शरद पवार, अजित पवार यांना लगावला.

पुणे : येत्या २४ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ दहा वाजून दहा मिनिटांनी कायमस्वरुपी बंद पडेल, असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी येथे व्यक्त केला.  स्वत:च्या जिल्ह्यात बारामती, आंबेगाव वगळता एकही जागा जिंकता आली नसताना बीडची धास्ती कशासाठी घेता, असा उपरोधिक टोला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी शरद पवार, अजित पवार यांना लगावला.

पर्वती विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांनी रविवारी (दि. १३) सहकारनगर येथील वाळवेकर लॉन्स येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, की पुण्यात इतकी वर्षे सत्ता असताना काँगे्रस- राष्ट्रवादी काँगे्रसने विकास का केला नाही. परंतु भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेवर आल्यानंतर मेट्रो, स्मार्ट सिटीसारखे विकासाचे अनेक प्रकल्प हाती घेतले. राज्यात मुंबईनंतर सर्वात मोठे व महत्त्वाचे शहर असलेल्या पुण्याच्या विकासाला गती देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News