स्वच्छ, गुणवत्तापूर्ण नगरपरिषदेच्या शाळांचा होणार ‘गौरव‘

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019
  • शहरातील नगर परिषदेच्या शाळांपैकी स्वच्छ व सुंदर तसेच गुणवत्तापूर्ण असलेल्या शाळांचा गौरव केल्या जाणार आहे. 
  • पुरस्कारासाठी पात्र शाळा निवडीकरिता पाच सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे.

यवतमाळः शहरातील नगर परिषदेच्या शाळांपैकी स्वच्छ व सुंदर तसेच गुणवत्तापूर्ण असलेल्या शाळांचा गौरव केल्या जाणार आहे. याकरिता प्रशासनातर्फे सन 2019-20 साठी गुणवत्तापूर्ण सर्वांग सुंदर शाळा पुरस्कार देणार आहे. या पुरस्कारासाठी पात्र शाळा निवडीकरिता पाच सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती शाळांना भेट देऊन निवड करणार आहे.

यवतमाळ नगर परिषदव्दारा संचालित नगर परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढीसाठी नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी नगर परिषदेच्या शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण तयार होण्याच्या दृष्टीने गुणवत्तापूर्ण सर्वांग सुंदर शाळा पुरस्कार घोषित केलेला आहे. प्रथम क्रमांक दहा लक्ष ,व्दितीय क्रमांक सात लक्ष, व तृतीय क्रमांक 5 लक्ष रुपये असा स्वच्छ शाळा पुरस्कार घोषित केलेला आहे. त्या अनुषंगाने नगर परिषद शाळेची निवड करण्याकरिता पाच सदस्य समिती गठित करण्यात आली आहे.

यात समिती अध्यक्ष पदमाकर मलकापुरे, सदस्य अविनाश शिर्के,सदस्य प्रशांत गावंडे, सदस्या सुप्रभा यादगीरवार, सदस्य उत्तमराव भोयर यांचा समोवश आहे. ही समिती नगर परिषदेच्या शाळांना भेट देवून पाहणी करणार आहे. तसेच पुरस्कारासाठी पात्र शाळांचा अहवाल प्रशासनाकडून सादर करणार आहे. त्यानुसार त्या शाळांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत असून यामुळे शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी सुद्धा मदत होईल अशी चर्चा सुरु आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News