दहावी, बारावी पुरवणी परीक्षा १७ जुलैपासून

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १० वी आणि १२ वीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्र बुधवारी (दि.१२) जाहीर केले.

अकोला - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १० वी आणि १२ वीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्र बुधवारी (दि.१२) जाहीर केले. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत पुरवणी परिक्षा घेण्यात येणार आहे.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) लेखी परीक्षा १७ ते ३० जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे. तर उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) लेखी परीक्षा १७ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार आहे. तसेच १२ वीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा १७ जुलै ते ३१ जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे. या परीक्षांचे वेळापत्रक mahahsscboard.maharashtra. gov.in या बेवसाईटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. यंदा दहावीचा निकाल कमी लागला असल्याने पुरवणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News