दहावी, बारावी फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 13 July 2019

औरंगाबाद - माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०१९ मध्ये दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची १७ जुलैपासून परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेस विभागातून दहावीसाठी २७ हजार २०३, तर बारावीसाठी १० हजार ३११ विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. 

अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) १७ ते ३० जुलैदरम्यान घेण्यात येणार आहे. तर १७ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) घेण्यात येईल. तर नवीन व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा १७ ते ३१ जुलैदरम्यान होणार असल्याची माहिती राज्यमंडळातर्फे देण्यात आली आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा 
महाराष्ट्र राज्य मंडळातर्फे प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा ९ ते १६ जुलैदरम्यान घेण्यात येत आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी विभागात ११० परीक्षा केंद्र व २२ परिरक्षक केंद्रे आहेत. तर बारावीच्या परीक्षेसाठी २८ परीक्षा केंद्र व १९ परिरक्षक केंद्र असतील, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News