ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराची भुरळ

उमेश वाघमारे 
Saturday, 26 January 2019

 दहावीची परीक्षा दिल्यानंतर अकारावी ते पदवीधर शिक्षणासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी शहराची वाट धरतात. यशस्वी होण्याचे उद्दिष्ट उराशी बाळगून आलेले अनेक विद्यार्थी शहरातील भौतिक सुखाच्या भूरळीत गुंतून जातात. आपला पाल्य शिकून मोठ्या पदावर जावा ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यासाठी आई-वडील रक्ताचं पाणी करून आपल्या मुला-मुलींना शिकवण्यासाठी परिश्रम करतात. मात्र ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी सध्याच्या काळात महाविद्यालयीन जीवन पद्धतीमध्ये मोठा बदल करतात. त्यामुळे पालकांवर शिक्षणाच्या खर्चापेक्षा त्यांच्या नवीन भौतिक सुख सुविधांच्या खर्चाचे ओझं अधिक जड होतं. त्याची जाणं विद्यार्थ्यांनी ठेवणे अपेक्षित आहे. आधीचं महाविद्यालयाच्या फिस आणि खासगी शिकवणीचा खर्च पूर्ण करतातना पालकांचे आर्थिक गणिते आयुष्याची बेरीज आणि वजाबाकीमध्ये अधिकच्या कष्टाचा गुणाकार करण्याची वेळ येते. मात्र अनेकदा पालकांच्या या गणितामध्ये विद्यार्थी भौतिक सुखात अडकल्यामुळे त्याच्या निकालाचा भागाकार हा पालकांनी केलेल्या कष्टांची माती करणारा ठरतो. याचा विचारही तरुण-तरुणांकडून केला जात नाही, हे वेदनादायक आहे. 

ग्रामणी भागातील तरुण-तरुणी जेव्हा शहरात येतो. तेव्हा शहरी लाईफ स्टाईलमध्ये अडकतात. त्यामुळे त्यांच्या भौतिक गरजांमध्ये मोठी वाढ होते. गरीब परिस्थीमधून आलेले विद्यार्थी देखील शहरात आल्यानंतर शहरातील मुलांकडे असलेल्या भौतिक सुखाची बरोबरी करण्याचा अठ्ठाहास करतात. त्यांच्या कपड्यांपासून शूज, हेरस्टाईल, मोबाईल, बाईक आणि पार्ट्या देखील करताना दिसून येतात. हल्लीची महाविद्यालयीन तरुणाई ही चहाच्या घोटासह सिगारेटचे कश घेताना दिसून येतात. केवळ शहरी स्टाइल म्हणून सुरू केलेल्या या बाबीं त्यांना केव्हा व्यसनाच्या आहारी पाडून अभ्यासपासून कोसोदुर घेऊन जातात, ते त्यांना ही कळत नाही आणि पालकही यापासून  अनभिज्ञ असतात. त्यात अनेकांना प्रेमारांचे डोळाहे लागतात. त्यामुळे अभ्यास सोडून तासांतास मोबाईलवर चॅटिंग करण्यात मग्न असतात. कॅालेज हे आपले  भविष्य घडविणारे मंदीर आहे. याचा ही विसर पडतो. आई-वडीलांनी कष्ट करून देलेले पैसे गिफ्ट आणि डेटींगवर उधळले जाता. त्यामुळे चार दिवसांची मज्जा झाल्यानंतर आयुष्याच्या परीक्षत अनेक जणं फेल होताना दिसतात.

त्यात आज प्रत्येक तरुण-तरुणींच्या हातामध्ये स्मार्ट फोन आला आहे. मोबाईलचा योग्य वापर केला तर तो वरदान आहे. मात्र त्यांची लत लागली तर तो शाप आहे, यात शंका नाही. आज प्रत्येक महाविद्यायलांमध्ये लाखो रुपये खर्च करून विद्यार्थ्यांसाठी  ग्रंथालय उभारलेले आहेत. मात्र सेमिस्टरची परीक्षा वगळता हे महाविद्यालयीन विद्यार्थी ग्रंथालयात दिसून येत नाहीत. प्रत्येक महाविद्यालयाच्या आवारामध्ये प्रत्येक विद्यार्थी मोबाईलमध्ये  सेल्फीसह व्हॉट्सअप, फेसबुक चॅटिंग आणि स्टेटसमध्येचं अडकल्याचे दिसून येते. यामुळे वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातून यशस्वी होण्याचा ध्यास घेऊन आलेले तरुण शहरी मृगजळामुळे मुख्य उद्दिष्टापासून लांब जात आहोत, याचा भान देखील या तरुणाईला राहिलेले नाही. त्यामुळे महाविद्यालयांमधून पासआऊट होणार्‍यांची संख्या अधिक दिसत असेल, मात्र यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या त्याच्या तुलनेत कमी आहे. कारण ग्रामीण भागातील तरुण शहरात आल्यानंतर शहराची भुरळ त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरते. 

त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शहरी भागात शिक्षणाचे बाळकडू घेण्यासाठी आल्यानंतर भौतिक सुखात न अडकता आपल्या उद्दिष्टांवर लक्ष देऊन यशस्वी होण्याकडे अधिक कल देणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे शहरात पाठविलेल्या आपल्या पाल्यांवर पालकांनी ही सतत लक्ष दिले तरच सशक्त भारताची तरुण पिढी निर्माण होईल, याचा पालकांसह विद्यार्थ्यांनी ही विचार करणे अपेक्षित आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News