सिनेमॅटोग्राफी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 22 October 2019

कथेच्या अनुषंगाने चित्रपटातील दृश्ये चित्रित करून दिग्दर्शकाला अभिप्रेत असणारा आवश्यक तो दृश्य परिणाम साध्य करण्याचे अतिशय महत्त्वाचे काम सिनेमॅटोग्राफर किंवा कॅमेरामन करत असतो. सिनेमॅटोग्राफर असण्यासाठी तुम्हाला व्हिजुअल आर्ट, रंगसंगती आणि प्रकाशाचे महत्त्व माहीत असण्याची गरज असते. स्वत: ची कलादृष्टी, चित्रपटातील कथेचा आवाका, काळ याचे भान तसेच उत्तम तांत्रिक जाण ही एका चांगल्या सिनेमॅटोग्राफरची लक्षणे आहेत. तसेच तुमचा स्थिर चित्रणाचा पूर्वानुभव इथे कामाला येऊ शकतो. आज चित्रपटाच्या तंत्रांमध्ये डिजिटल क्रांतीमुळे आमूलाग्र बदल घडताना दिसतो आहे.

कथेच्या अनुषंगाने चित्रपटातील दृश्ये चित्रित करून दिग्दर्शकाला अभिप्रेत असणारा आवश्यक तो दृश्य परिणाम साध्य करण्याचे अतिशय महत्त्वाचे काम सिनेमॅटोग्राफर किंवा कॅमेरामन करत असतो. सिनेमॅटोग्राफर असण्यासाठी तुम्हाला व्हिजुअल आर्ट, रंगसंगती आणि प्रकाशाचे महत्त्व माहीत असण्याची गरज असते. स्वत: ची कलादृष्टी, चित्रपटातील कथेचा आवाका, काळ याचे भान तसेच उत्तम तांत्रिक जाण ही एका चांगल्या सिनेमॅटोग्राफरची लक्षणे आहेत. तसेच तुमचा स्थिर चित्रणाचा पूर्वानुभव इथे कामाला येऊ शकतो. आज चित्रपटाच्या तंत्रांमध्ये डिजिटल क्रांतीमुळे आमूलाग्र बदल घडताना दिसतो आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण आता डिजिटल कॅमेऱ्याच्या साहाय्याने केले जात आहे. त्यामुळे डिजिटल तंत्र अवगत असणाऱ्या कॅमेरामनला आज उत्तम मागणी आहे. त्या संदर्भातील व्यावसायिक प्रशिक्षण घेतल्यास या विभागात अनेक चांगल्या संधी मिळू शकतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News