उत्तम करिअरसाठी योग्य क्षेत्राची निवड महत्वाची

डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर
Friday, 21 June 2019

आपला विषय शिक्षणक्षेत्र नाही तर करिअर वाटा असा आहे म्हणून उपयोजित करिअर म्हणजे काय हे पाहूयात.

अनेकांना दहावी व बारावीमध्ये साठ टक्‍क्‍यांच्या आसपास मार्क पडलेले असतात. सध्याच्या विविध पदव्यांच्या परीक्षांचा मार्कांचा स्तर दहावीच्या मार्कांच्या फारसा मागे राहिलेला नाही. दहावी किंवा बारावीतील अनेक विद्यार्थी जेव्हा पदवीला ७५/८०/९० असे टक्के घेऊन मला भेटायला लागले तेव्हा त्या धक्‍क्‍यातून सावरायला जरा कठीणच गेले. पण, आता गेली सात-आठ वर्षे मी त्यातून सावरलो आहे. कारण, सलग वर्षभर बेकार राहून अनेक मुलाखतीत निवड न झालेले जेव्हा समोर आले तेव्हा त्यांच्या विषयातील अर्धेकच्चेपणाच अधोरेखित होत होता. इंजिनिअरिंगसाठीची यावरची चर्चा इंडस्ट्रीतील सारेच जण करतात पण अन्य पदवीधरांबद्दल कोणीच बोलत नाही म्हणून हा उल्लेख.

असो आपला विषय शिक्षणक्षेत्र नाही तर करिअर वाटा असा आहे म्हणून उपयोजित करिअर म्हणजे काय हे पाहूयात.

एखादी भाषा घेऊन बीए झालेल्यांनी वृत्तपत्रविद्या, मास कम्युनिकेशन, डिजिटल मार्केटिंग अशाचा विचार करावा. समाजशास्त्र, राज्यशास्त्र अशांचे भाषेवर किमान प्रभुत्व असेल तर त्यांनासुद्धा या पदव्यांनंतर नेमकी मागणी येऊ शकते. एकेका विषयांसाठी अभ्यासू, विषयप्रधान पत्रकारिता हा ट्रेंड गेल्या दशकापासून सुरू आहे.

इतिहास व भूगोलासाठी पर्यटन, पर्यावरण, लायब्ररीयन, म्युझियम क्‍युरेटर या वाटांचा विचार होऊ शकतो. भूगोल व कॉम्प्युटर याला इंग्रजीची जोड असेल तर जिओ इंफरमॅटिक्‍स हा रस्ता थेट आयटीकडेच नेतो.

इकॉनॉमिक्‍स इंग्रजीतून केले असेल तर फायनान्स व बॅंकिंगचे छोटे-मोठे पदविका कोर्स उपलब्ध आहेत. अर्थशास्त्र मराठीतून घेतले असेल तरी पतपेढ्या, सहकारी बॅंका, सरकारी बॅंकांच्या प्रवेशासाठीच्या परीक्षांची तयारी करता येऊ शकते. मानसशास्त्र विषयातून काउन्सिलिंग किंवा मास्टर्स इन सोशल वर्कचा रस्ता सुरू होऊ शकतो.

इंग्रजी माध्यमातून सायकॉलॉजी केले तर प्री-प्रायमरीचा कोर्स करून हळूहळू स्कूल काउन्सेलरपर्यंत प्रगती करणारे आहे. अनेक शैक्षणिक साहित्यसंच विक्री कंपन्यांतसुद्धा प्रवेश शक्‍य होतो. विषयवारी करिअरची किंवा प्रगतीची एक छोटी नोंद फक्त आपण या छोट्या जागेत घेऊ शकतो एवढेच.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News