चीन, इंडोनेशियाची जहाजे अंजनवेलजवळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • यंत्रणांनी रोखले
  • पोलिसांकडून चौकशी सुरु

दाभोळ : भारतीय तटरक्षक दल व यंत्रणांची परवानगी न घेता भारतीय सागरी हद्दीत प्रवेश करणाऱ्या इंडोनेशियन व चिनी मच्छीमारी बोटींची चौकशी तटरक्षक दल, सीमाशुल्क (कस्टम्स) विभाग व सागरी पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र, या बोटींमध्ये काही संशयास्पद आढळलेले नाही. दोन्ही बोटींत मिळून ३५ कर्मचारी आहेत.

या बोटी अंजनवेलजवळील समुद्रात ६ जूनपासून आहेत.
समुद्रातील आंतरराष्ट्रीय हद्दीत वादळाचा धोका उत्पन्न झाल्याने या दोन बोटी भारतीय सागरी हद्दीत आश्रयाला आल्या असल्याचा अंदाज आहे. अंजनवेल दीपगृहापासून अर्धा नॉटीकल मैल हद्दीत एक इंडोनेशियन व एक चिनी अशा दोन मच्छीमारी बोटी आढळून आल्या. भारतीय कोस्ट गार्ड, सीमाशुल्क विभाग व सागरी पोलिस यांनी या बोटी थांबवून ठेवल्या आहेत.

या मच्छीमारी बोटी अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज आहेत. एका बोटीत सॅटेलाइट फोन असून, त्याचा वापर भारतीय हद्दीत आल्यावर केल्याचे लक्षात आल्यावर यंत्रणांनी कारवाई केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News