बेसल चिला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 July 2019

साहित्य - बेसन- १ मोठी वाटी, तेल २ चमचे, हळद पाव चमचा, तिखट १/२ चमचा, बेकिंग पावडर पाव चमचा, ओवा अर्धा चमचा, बारीक चिरलेली मिरची २, कोथिंबीर चिरलेली १/२ वाटी, बारीक चिरलेला कांदा १, बारीक चिरलेला टोमॅटो १, मीठ चवीनुसार.

कृती - एका बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यात हळद, तिखट, बेकिंग पावडर, ओवा, मीठ घालून एकत्र करा. त्यात पाणी घालून पातळ पेस्ट करा. जेणेकरून गुठळ्या राहणार नाहीत. मग त्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची घालून एकत्र व्यवस्थित मिक्‍स करा. तवा गॅसवर गरम करायला ठेवा. तापला की, हे मिश्रण डावाने पातळ पसरवा. वरून थोडे तेल घाला. खालून चिला झाला की परतून दुसरी बाजू भाजून घ्या. दोन्ही बाजूने छान खरपूस झाला की खायला द्या.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News