मुलांच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये मुली "या" गोष्टी चेक करतात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 20 July 2019

आधुनिक जगात एखाद्या व्यक्तिची ओळख ही सोशल मीडिया प्रोफाइलवरुन होते. मुल ज्यांची कल्पणाही करु शकत नाहीत त्या गोष्टी मुली प्रोफाइलमध्ये शोधतात.

अनेक तरुण इतरांना प्रभावीत करण्यासाठी सुंदर प्रोफाइल फोटो ठेवतात. त्यांना अस वाटत असतं की, आपला सुंदर फोटो पाहुन मुली आकर्षीत होतील पण असं नाहीये. तरूणी केवळ प्रोफाइल फोटो पाहून तुमच्याकडे आकर्षीत होत नाहीत. तरुणी मुलांच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये कोणत्या गोष्टी चेक करतात पाहूया...
 

तो सद्या काय करतो?
मुलांच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये तो सद्या काय करतो किंवा कोणती नोकरी करतो हे चेक करतात. कलाकार, इंजिनिअर, डॉक्टर यासोबतच मोठं करिअर असलेल्या किंवा नामांकीत संस्थेत शिकत असाल तर तुमचं प्रोफाइल मुलींना पसंत येऊ शकतं.

फोटो गॅलरी
मुलांच्या सोशल मीडिया प्रोफाइलमधला सर्वांत महत्वाचा विभाग फोटो गॅलरी असतो. मुली फोटो गॅलरी नक्की चेक करतात. फोटोचे बारकाईने निरिक्षण करतात. तुमच्या फोटो मधुन तुम्ही कशा प्रकारे जीवन जगता याची माहिती मुलिंना मिळत असते. तुम्ही किती कुल आहात, कसे राहता, तुमच्या आवडी-निवडी यातून कळत असतात. मग मुली ठरवतात की, तुमची आणि त्यांची मैत्री होऊ शकते की नाही.

स्टेटस
सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे तरुणी मुलांच्या प्रोफाइलमध्ये मॅरेज स्टेटस बघतात. पण जर तुमचं लग्न झालेलं असे तर स्टेटस सिंगल ठेवण्याची चूक करू नका. कारण हे नैतिकदृष्ट्या चुकीचं आहेच, सोबतच तुमच्या प्रोफाइलवर कुणी विश्वासही करणार नाही. म्हणून स्टेटस अपडेट ठेवणे महत्वाचे आहे.
 

फ्रेन्डलीस्ट
प्रोफाइलमध्ये जावुन मुली फ्रेन्डलीस्ट चेक करतात. तुमच्यात आणि त्यांच्यात किती कॉमन फ्रेन्ड आहेत हे पाहतात. त्यानंतर तरूणी फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवतात.

लाईक
मुल कोणत्या गोष्टी लाइक करतात हे मुली चेक करतात. तुम्ही कुणाला लाईक करता यावरुन तुमचे विचार, भावणा प्रकट होतात. मुल आणि मुली समान पेजेस, व्हिडिओ, बातम्या यांना लाईक करत असतील तर मुली तुम्हाला फॉलो करतील. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News