काश्मीर पेटवणाऱ्यांची मुले परदेशांत
नवी दिल्ली - ‘काश्मीर खोऱ्यातील शाळा दहशतीखाली बंद पाडून स्वतःची पोरेबाळे मात्र शिकायला विदेशांत पाठविण्याचे प्रकार करणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांना वेसण घालू,’ या गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत दिलेल्या इशाऱ्यापाठोपाठ त्यांच्या मंत्रालयाने आज अशा शेकडो नेत्यांची कुंडलीच मांडली आहे.
नवी दिल्ली - ‘काश्मीर खोऱ्यातील शाळा दहशतीखाली बंद पाडून स्वतःची पोरेबाळे मात्र शिकायला विदेशांत पाठविण्याचे प्रकार करणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांना वेसण घालू,’ या गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत दिलेल्या इशाऱ्यापाठोपाठ त्यांच्या मंत्रालयाने आज अशा शेकडो नेत्यांची कुंडलीच मांडली आहे.
काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानच्या पाठिंब्याने फुटीरतावादी कारवायांना सक्रिय बळ देणाऱ्या अशा ११२ नेत्यांची किमान २२० मुले विदेशांत शिक्षण घेऊन तिकडेच स्थायिक झाल्याचे या निवेदनावरून स्पष्ट होते.काश्मीरबाबतच्या विधेयक मंजुरीवेळी बोलताना शहांनी सांगितले होते, की मोदी सरकारही ‘काश्मिरियत- इन्सानियत- जम्हुरियत’च्याच मार्गाने काश्मीरचा तिढा सोडविण्याचे प्रयत्न करत आहे. शहा यांनी सुरू केलेल्या या मोहिमेला ‘पोल खोल अभियान’ असे भाजप वर्तुळात म्हटले जाते. संसदेत शहा यांनी काश्मीर खोऱ्यातील १३० हुरियत नेत्यांची कुंडली मांडली तरी ताज्या यादीत इतर फुटीरतावादी संघटनांच्या नेत्यांचा लेखाजोखा मांडलेला दिसतो.
यांचा मुलगा नईम याने पाकिस्तानातून एमबीबीएसची पदवी घेतली असून, तो रावळपिंडीत वैद्यकीय व्यवसाय करतो. गिलानी यांची मुलगी सौदी अरेबियात शिक्षिका असून, जावई अभियंता आहे. त्यांची एक नात तुर्कस्तानात पत्रकार आहे, तर दुसरी नात पाकिस्तानात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. गिलानींच्या दुसऱ्या जावयाचा मुलगाही सौदी अरेबियात आहे.
असिया अंद्राबी : ‘दुख्तरने मिल्लत’ या संघटनेची प्रमुख असलेल्या व सध्या तुरुंगात असलेल्या असियाचा एक मुलगा मलेशियात शिकतोय आणि दुसरा ऑस्ट्रेलियात असतो. असियाची बहीण मरियमही मलेशियात असते.
असरफ सेहरई : ‘हुरियत’च्या गिलानी गटाचे सरचिटणीस असलेल्या असरफ सेहरई यांची खालिद आणि आबिद असरफ ही दोन्ही मुले सौदी अरेबियात नोकरी करतात.
मोहम्मद शफी रेशी : मुलगा अमेरिकेत पीएच.डी. करत आहे.
अशरफ लाया : मुलगी पाकिस्तानात वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
मोहम्मद युसूफ मीर : यांची मुलगी पाकिस्तानात वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
गुलाम मोहम्मद बट्ट : एक मुलगा सौदी अरेबियात डॉक्टर आहे.
मीरवाइज उमर फारूक
यांची बहीण रुबिया या अमेरिकेत डॉक्टर आहे.
बिलाल लोन यांची एक मुलगी आणि जावई लंडनमध्ये स्थायिक झाले असून, लहान मुलगी ऑस्ट्रेलियात शिकत आहे.