लहानपणाच्या मैत्रीत प्रेम 'मधे' आले...

पूनम माने
Wednesday, 12 June 2019

अवघ्या सहा वर्षांच्या होत्या जेव्हा दोघींची पहिली भेट झाली. अंगणवाडीचे ते दिवस. एकीच नाव नेहा आणि दुसरीच पुजा, अशा या दोन मैत्रिणी जवळ जवळच बसायच्या आणि डब्बे पण एकत्रच खायच्या. तेव्हा तर त्यांना मैत्री म्हणजे नेमके काय हे ही माहित नसेल कदाचित... 

अवघ्या सहा वर्षांच्या होत्या जेव्हा दोघींची पहिली भेट झाली. अंगणवाडीचे ते दिवस. एकीच नाव नेहा आणि दुसरीच पुजा, अशा या दोन मैत्रिणी जवळ जवळच बसायच्या आणि डब्बे पण एकत्रच खायच्या. तेव्हा तर त्यांना मैत्री म्हणजे नेमके काय हे ही माहित नसेल कदाचित... 

गावाकडच्या असल्यामुळे कस गावाकडे वेगवेगळ्या शाळा नसतात, गावाकडे एकच शाळा असते. पहिली ते चौथी दोघीपण एकाच वर्गात शिकल्या. कधीही भांडण नाही, का कधी अबोला नाही. रुसवा फुगवाही कधीच नाही, आता मैत्रीचा अर्थ त्यांना थोडा थोडा कळत होता. चौथीपर्यंतच शिक्षण तर मस्त मजेत झाल. आता पुढे पाचवीसाठी हायस्कूलला प्रवेश घेतला. तेव्हाही दोघींनी एकाच वर्गात प्रवेश घेतला. दोघींनापण खुप आनंद झाला.

सातवीपर्यंत एकाच बॅन्चवर बसुन खुप अभ्यास करायच्या पण आठवीत गेल्यावर वर्गशिक्षकांनी ठरवल की, आता विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था बदलायची तेव्हा मात्र दोघींनापण रडू आल, त्या दोघीही सरांजवळ गेल्या आणि सरांना विनंती केली. मग काय शेवटी त्यांनी सरांना मनवलच दोन नंबरची बॅन्च पण फिक्स झाली. दोघी पण मनलावून अभ्यास करायच्या अभ्यासात एकमेकींना सपोर्ट करायच्या. इतकी घट्ट मैत्री होती. पण कधीच दोघीही एकमेकींच्या घरी गेल्या नव्हत्या.  
  
एके दिवशी सहजच बसल्या बसल्या नेहा पुजाला म्हणाली, ये ना माझ्या घरी नोटबुक घ्यायच्या निमित्तान जायचं नक्की झाल. पाच वाजले हायस्कूल सुटले पुजा घरी आली सायकल काढली आणि नेहाच्या घरी पोहोचली, तिच्या घरी आई वडील दोन मोठ्या बहिणी आणि एक भाऊ अस कुटुंब होत. वडील जरासे कडकच वाटत होते. आई मात्र खुपच निरागस होती.

बहीणी पन छान बोलल्या नेहा घरात सर्वात लहान असल्याने सगळेच तिचे खुप लाड करायचे, हे ही पुजाच्या लक्षात आलं त्यानंतर पुन्हा पुजाच नेहाच्या घरी जाणेच झाले नाही. कारण अभ्यासालाच वेळ पुरत नसायचा. दहावीत दोघींनापण खुप चांगली टक्केवारी पडली. कारण दोघींच्याही आई वडीलांनी दोघींनाही शिक्षणाच्या बाबतीत काहीच कमी पडू दिलं नाही.

आता काॅलेजला प्रवेश घ्यायची वेळ आली, योगायोगाने दोघींनीपण एकाच काॅलेजला ऍडमिशन घेतले. अॅडमिशन घेतल खर पण शाखा मात्र दोघींनी वेगवेगळ्या घेतल्या, तिथेच मैत्रीत थोडासा दुरावा आला. आता ना ही एक वर्ग राहिला होता, ना ही एक बॅन्च आता दोघींच्याही बॅन्च वेगवेगळ्या झाल्या होत्या आणि वर्गही, गावापासून काॅलेज अर्ध्या तासाच्या अंतरावर होते.

त्यामुळे काॅलेजपर्यंतचा बसचा प्रवास एकत्रच व्हायचा, आता कॉलेजमध्ये सगळेच मज्जा करतात. पण त्यातही मर्यादेच भान ठेवणे आवश्यक आहे. काॅलेजला असताना एक मुलगा सतत नेहाचा पाठलाग करायचा. जिकडे ती जाईल तिकडे तिच्या मागे तो असायचा. हे पुजाच्या लक्षात आलं होतं. त्या मुलाच नेहाच्या मागे मागे फिरण इतकं वाढल की हळूहळू आख्ख काॅलेज नेहाला नाव ठेवू लागल, हे मात्र पुजाला अजिबातच आवडल नाही.

यावर पुजाने नेहाला विचारले कि हे नक्की चाललेय काय? त्यावर नेहाने हसत उत्तर दिले. 'आहे की चांगला जाऊ का त्याच्यासोबत पळून'  नेहाचे ते शब्द ऐकून पुजाच डोक सुन्न झालं होतं. पुजाने नेहाला खुप समजावून सांगितल. पन ती काहीही समजण्या पलीकडे गेली होती. 

मग काय पुजाने कसलाही विचार न करता घडलेली सगळी घटना नेहाच्या घरच्यांना सांगितली. याचा मात्र नेहाला फारच राग आला, तु हे बरोबर नाही केलस असही नेहा बोलली. पण पुजा तरी काय करणार, नेहाने पुजापुढे काही पर्यायच ठेवला न्हवता.

पुढे काय मग नेहाच्या वडीलांनी तिच काॅलेजला जाणच बंद केल आणि तिला गावाकडेच महाविद्यालयात टाकले. या गोष्टीचा नेहाच्या मनात फारच क्रोध निर्माण झाला. पुढे पुजाची बारावी काॅलेजला पुर्ण झाली, आणि नेहाची महाविद्यालयात, पण रागाच्या भरात नेहाने मात्र पुजासोबतचा संपर्क पुर्णपणे तोडला होता.

पुढे पुजाच लग्न झाल. पुजा आई वडीलांपासुन लांब राहायची, आजी आजोबांजवळ तरीही तिने आई वडीलांच्या परवानगीनेच विवाह केला. कारण पुजाला माहीत होत की एक आई वडीलच असतात जे आपल्या मुलांच्या आयुष्याचे कधीच चुकीचे निर्णय घेत नाहीत. पुढे पुजाच लग्न होऊन दोन वर्षे झाली, तरी नेहाची काहीच खबर न्हवती. एवढंच कळायचं की ती आता घरीच असते.  
 
काही दिवसांनी असाच पुजाला एका मैत्रिणीचा फोन आला, नेहा पळून गेली, आणि ते ही तिच्या घराजवळच्याच एका मुलासोबत त्या मुलाला ना धड काम ना धंदा, त्याचेच खायचे वांदे हे सगळं ऐकल्यावर पुजाच्या त्या भरलेल्या डोळ्यांसमोर आला तो एक चेहरा, तो निरागस चेहरा होता.

नेहाच्या आईचा काय तिची अवस्था झाली असेल. वडीलांची किती घालमेल झाली असेल, नुसत्या विचारानेच अंगावर शहारा येतो, इतकं मोठ पाऊल उचलताना ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या जन्मदात्यांचा विचार एकदाही कसा मनात येत नाही. नेहाच लग्न होऊन दोन तिन महिने झालते. 

पण इकडे पुजाला काहीच कळायला मार्ग नव्हता. तरीपण पुजाला नेहासोबत बोलायचं होतं. अनेक प्रश्न होते ज्याची उत्तर नेहाला विचारायाची होती. कसाबसा प्रयत्न करुन पुजाने नेहाचा फोन नंबर मिळवला, तिला फोन केला. फोन तिच्या नवऱ्याने उचलला आवाज आला कोण बोलतय, यावर पुजाने तिचे पुर्ण नाव सांगीतले व ति नेहाची मैत्रिण आहे, असही ती बोलली आणि नेहाकडे फोन देता का? अस विचारताच मागुन नेहाचा आवाज आला.

 "पुजा नावाची माझी एकही मैत्रीण न्हवती कोण आहे ही मला माहित नाही. मग मी का बोलु तिच्याशी" तिचे हे शब्द ऐकून मात्र पुजाच्या काळजाच पाणी पाणी झालं. बारा वर्षांच्या मैत्रिची दोन मिनिटात राख झाली होती. पुजाच्या मनाला अजुनही हा विचार खातो की कुठ कमी पडलो आपण मैत्री टिकवायला. माणूस बदलतो हे आजपर्यंत फक्त ऐकल होत आणि आता अनुभवलसुध्दा.

शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, प्रेम करा. प्रेमाला माझा विरोध नाही कारण देवानेच हे जग निर्माण केल. त्यानेच या जगात माणसे निर्माण केली, माणसांना सुंदर अस ह्रदय ही दिल, आणि त्या ह्रदयाला शिकवलं निस्वार्थ प्रेम करायला. देवाने आपल्या घरात देवासारखीच दोन माणसं दिलेली असतात.

त्यांचा मान आणि मन जपुन प्रेम करायला शिका. आजकालच्या पिढीसाठी पळून जाऊन लग्न करन हे एक पॅशन बनल आहे. त्यांना त्यात काहीच वावगं वाटतं नाही. पण हे ही लक्षात असु द्या जर आईवडीलांचा हात आपल्या हातात असेल ना तर जगातील कोणतीच ताकद आपल्याला हरवू शकत नाही. 

जी व्यक्ती आईवडीलांचा इतका मोठा विश्वासघात करते ती व्यक्ती आयुष्यात कधीच सुखी राहू शकतं नाही. आईवडीलांना जपायला शिका कारण आईवडीलांचे दोन सहानुभूतीचे बोल सुध्दा आपल्याला इतकी ताकद देतात की आपण पुर्ण जग जिंकू शकतो.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News