नवी मुंबई मध्ये लवकरच सुरु होणार चाईल्ड  हेल्पलाईन 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 7 November 2019

लहान मुलांच्या मदतीसाठी चाईल्ड हेल्पलाईन नसल्याने येथील १०९८ चे   कॉल  हे मुंबईच्या हेल्पलाईनवर जात होते. परिणामी अडचणीत सापडलेल्या या भागातील लहान मुलांना मदत पोचविण्यात अडचणी येत होत्या.

नवी मुंबई :संकटात किंवा अडचणीत सापडलेल्या मुलांच्या मदतीसाठी १०९८ ही चाईल्ड हेल्पलाईन आपत्कालीन सेवा आता नवी मुंबईतही सुरु होणार आहे. केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने यासाठी खारघर येथील युवा संस्थेची निवड केली. त्यामीउळे येत्या आठवड्यापासून ही हेल्पलाईन सेवा सुरु होईल. 

नवी मुंबईत लहान मुलांच्या मदतीसाठी चाईल्ड हेल्पलाईन नसल्याने येथील १०९८ चे   कॉल  हे मुंबईच्या हेल्पलाईनवर जात होते. परिणामी अडचणीत सापडलेल्या या भागातील लहान मुलांना मदत पोचविण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे नवी मुंबईतही हेल्पलाईन सुरु करण्याची मागणी विविध संस्था संघटनांकडून करण्यात येत होती. या मागणीला नवी मुंबई महापालिकेने हिरवा कंदील दिला असून त्यासाठी केंद्र सरकारच्या महिला व बाळ विकास मंत्रालयाने खारघर येथील युवा संस्थेची निवड केली आहे. संस्थेची सामाजिक कार्याचीदखल घेत नवी मुंबईत चाईल्ड हेल्पलाईनची सेवा सुरु करण्यात येणार आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News