मुख्यमंत्री आता थेट कोर्टावर नाराज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019
  • कोर्टाच्या शेरेबाजीबद्दल मुख्यमंत्र्यांची नाराजी

मुंबई : ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे हत्या खटला प्रकरणात न्यायालयाने मुख्यमंत्र्यांबद्दल तोंडी शेरेबाजी केल्यावरून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. 

या शेरेबाजीबाबत विधानसभेत स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यांतील काही खटल्यांतील सुनावणीदरम्यानच्या न्यायलयातील निकालांचे संदर्भही दिले.

पानसरे खून खटल्याची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एका पक्षाचे आहेत का? अशी तोंडी टिप्पणी केली होती. त्यासंदर्भातील बातम्याही प्रसारित झाल्या होत्या. लोकशाहीच्या तीनही स्तंभांनी आपल्या चौकटीत काम करावे आणि एकमेकांच्या अधिकारात अधिक्षेप करू नये, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News