ठरलं! राज्यात सेना-भाजपला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद - युवासेना  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यात झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचा निर्णय झाला आहे. या बैठकीला जे उपस्थित नव्हते त्यांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी युती तोडण्याचा प्रयत्न करु नये.'असे  युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी आपल्या ट्वीटमध्ये थेट असं म्हटलं आहे. वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे अगदी जवळचे सहकारी मानले जातात. <

>

शिवसेना आणि भाजपमध्ये सारं काही आलबेल नसल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून समोर येत आहेत. अशा वेळी आता वरुण सरदेसाई यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता नव्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री हवा असा आदेश राज्यातील भाजप नेत्यांना दिल्यानंतर शिवसेना नाराज झाल्याचं वृत्त कालच समोर आलं होतं.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News