मुख्यमंत्र्यांना राज्यातील जनतेची भिती वाटते: खासदार अमोल कोल्हे

जालिंदर धांडे
Saturday, 24 August 2019

अंबाजोगाईत शिवस्वराज्य यात्रेस भरभरुन प्रतिसाद. यामध्ये युवकांची संख्या सर्वात जास्त दिसुन येत आहे. शनिवारी शिवस्वराज्य यात्रेचे आगमन बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात झाले.

बीड : रायगड येथुन राज्यात सुरु झालेली शिवस्वराज्य यात्रा शनिवारी (ता.२४) अंबाजोगाईत दाखल झाली. यावेळी येथील नागरीकांनी मोठ्या संख्येने यात्रेत सहभाग घेत यात्रेचे स्वागत मोठ्या उत्साहात केले. यावेळी युवकांच्या वतिने बाईक रॅलीचे आयोजनही करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या संख्येने युवकांनी सहभाग घेतला होता. सभेत बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना राज्यातील जनतेची भिती वाटत आहे, यामुळेच ज्या ठिकाणी महाजनादेश यात्रा जाईल, त्याठिकाणाच्या माताभगिनींना व स्थानबद्ध करण्यात येत आहे. यामुळे ज्यांना राज्यातील जनेतीची भिती वाटते, त्यांनी फिरु नये असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केले. 

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतिने राज्यात सुरु करण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेला ठिकठिकाणी नागरीकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये युवकांची संख्या सर्वात जास्त दिसुन येत आहे. शनिवारी शिवस्वराज्य यात्रेचे आगमन बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात झाले. युवकांच्या वतिने बाईक रॅली काढत, सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी नागरीकांना मार्गदर्शन केले. ते बोलताना म्हणाले की, राज्यातील युवकांना मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. गेल्या पाच वर्षात एक लाख, ४२ हजार कंपन्या बंद पडलेल्या आहेत. यामुळे बेरोजगारीत भर पडली आहे. तसेच महिल्ा अत्याचाराच्या घटना झालेल्या वाढी बाबात त्यांनी आपले मत व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठनेते जयंत पाटील, विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, आमदार सतिष चव्हाण, आमदार विक्रम काळे, महेबुब शेख, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर, नरेद्र काळे नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, नमिता मुंदडा यांच्यासह मोठ्यासंख्येने नागरीक उपस्थित होते. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News