स्वातंत्र्यदिनातील मोदींच्या भाषणाची चिदंबरम यांच्याकडून स्तुतीसुमने

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019

नवी दिल्ली: माजी अर्थमंत्री व भाजपचे कडवे विरोधक असलेले कायदेतज्ज्ञ पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणाची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. विशेषतः पंतप्रधानांच्या भाषणातील तीन मुद्दे अतिशय दूरदृष्टीचे आहेत, अशा शब्दांत चिदंबरम यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. 

राज्यसभेवर महाराष्ट्रातून निवडून आलेले चिदंबरम हे मोदी सरकारच्या अर्थधोरणांचे कडवे टीकाकार आहेत. नोटाबंदी व जीएसटीपासून यंदाच्या अर्थसंकल्पापर्यंत त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर कडाडून हल्ला चढविला आहे.

नोटाबंदीवरील त्यांच्या भाषणाला तर सरकार पक्षाकडे समर्पक उत्तरच नसल्याचे दिसून आले होते. त्याच चिदंबरम यांनी मोदींच्या भाषणाची स्तुती करण्यासाठी तीन ट्‌विटची ‘तिहाई’ बांधणे लक्षणीय मानले जाते. चिदंबरम यांनी आज सकाळी सलग तीन ट्‌विट करत मोदींच्या भाषणाची स्तुती केली.

या तीन घोषणांचे सर्वांनी स्वागत करायला पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी म्हटले की लोकसंख्या विस्फोट रोखण्यासाठी व विकास साधण्यासाठी प्रत्येकाने कुटुंब छोटे ठेवणे हीदेखील देशभक्तीच आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News