जीन्स घातलेल्या महिलांना आरटीओ अधिकाऱ्यांनी दिला 'हा' आदेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 22 October 2019

चालक परवाना परीक्षेसाठी ज्या महिलांनी जीन्स किंवा थ्रीफोर्थ पँट्स घातल्या होत्या, त्यांना घरी जाऊन कपडे बदलून येण्याचे आदेश आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला असल्याचे समोर आले आहे.  टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नई येथील आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा अलिखित आदेश काढला आहे. 

चेन्नईतील केके नगर परिसरात असलेल्या आरटीओ कार्यालयात चालक परवाना परीक्षेसाठी दाखल होणाऱ्या महिलांना असे आदेश देण्यात आले. चालक परवाना परीक्षेसाठी आलेल्या महिलांना नीट कपडे घालून या, असे आदेश आरटीओ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या प्रकारामुळे महिलावर्गात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.

या प्रकाराबद्दल महिलांनी संताप व्यक्त केला आहे. कोणते कपडे घालून परीक्षा द्यावी असा काहीही नियम नाही. जीन्स किंवा थ्री-फोर्थ पँट हे काही अश्लील पेहराव नाहीत. मग आरटीओने असे नियम लादायचं कारण काय, असा सवाल या महिलांनी केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News