तुरुंगातील मित्र आणि चविष्ट जेवणाची आठवण आणि 'तो' पुन्हा तुरुंगात गेला 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 18 July 2019

तुरुंगवास म्हटले तर मोठं मोठ्या गुन्हेगारांना नकोसे वाटते. मात्र,चेन्नईमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. तुरुंगात मिळणारे चविष्ट जेवण आणि तेथील नवीन मित्रांचा सहवास मिळावा म्हणून एका कैद्याने सुटकेनंतर पुन्हा तुरुंगात जाण्यासाठी गुन्हा केल्याचा प्रकार घडला आहे. 

तुरुंगवास म्हटले तर मोठं मोठ्या गुन्हेगारांना नकोसे वाटते. मात्र,चेन्नईमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. तुरुंगात मिळणारे चविष्ट जेवण आणि तेथील नवीन मित्रांचा सहवास मिळावा म्हणून एका कैद्याने सुटकेनंतर पुन्हा तुरुंगात जाण्यासाठी गुन्हा केल्याचा प्रकार घडला आहे. 

या कैद्याला अटक करुन पोलिसांनी परत त्याच तुरुंगात डांबल्याने हा कैदी खूपच खूष आहे. कैद्यांमध्ये होणारे वाद आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांसंदर्भातील बातम्या अनेकदा पहायला मिळतात.पण असा प्रकार पहिल्यांदाच समोर आला आहे. 

मार्च महिन्यामध्ये चोरीच्या आरोपाखाली ५२ वर्षीय ज्ञानप्रकाशमला अटक करुन पुझा येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. २९ जून रोजी त्याला जामीन मंजूर झाल्याने तो तुरुंगातून बाहेर आला. मात्र तुरुंगामधील मित्र आणि तेथे मिळणाऱ्या चविष्ट जेवणाची ज्ञानप्रकाशमला सतत आठवण यायची. त्यामुळेच पुन्हा तुरुंगात जाता यावे म्हणून ज्ञानप्रकाशम याने मुद्दाम एक दुचाकी आणि पार्क केलेल्या गाड्यांमधील पेट्रोल चोरले. 

इतकेच नाही चोरी कोणी केली याबद्दल पोलिसांचा गोंधळ होऊ नये आणि त्यांना आपली ओळख पटावी म्हणून ज्ञानप्रकाशमने मुद्दाम सीसीटीव्हीसमोर उभं राहून आपला चेहराही दाखवला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे ज्ञानप्रकाशमला अटक करुन पुन्हा तुरुंगात टाकले आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News