आज २ चॅम्पियन्स भिडणार आमने - सामने

जयेश सावंत (यिनबझ)
Wednesday, 14 August 2019

चॅम्पियन्स लीग विजेत्या लिव्हरपूल आज तुर्कीमध्ये युरोपा लीगच्या विजेत्या चेल्सीची भिडणार आहेत.

इस्तंबूल: आजची मध्यरात्री फुटबॉल शौकिनांसाठी खूप सुखकर असणार आहे. कारण आज फक्त इंग्लंडमधीलच नव्हे तर यूरोपातील २ चॅम्पियन एकमेकांना भिडणार आहेत.

यंदाचा युएफा सुपर कप हा एक अर्थाने विशेष असेल, कारण  दोन इंग्लिश संघांमध्ये होणारा हा पहिला वाहिला सामना असेल. चॅम्पियन्स लीग विजेत्या लिव्हरपूल आज तुर्कीमध्ये युरोपा लीगच्या विजेत्या चेल्सीची भिडणार आहेत.

इस्तंबूलमध्ये झालेल्या २००६च्या ऐतिहासिक चॅम्पियन्स लीग विजयानंतर  लिव्हरपूल त्याची पुनरावृत्ती  करण्यास पुन्हा सज्ज असेल.

गेल्या वर्षी अ‍ॅटलेटिको माद्रिद आणि रियल माद्रिद यांनी सुपर कपमध्ये चॅम्पियन बनण्यासाठी झुंज दिली होती. त्यात डिएगो सिमोनच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या अ‍ॅटलेटिको माद्रिदच्या बाजूने विजयी निकाल लागला होता.

सामना : लिव्हरपूल विरुद्ध चेल्सी 
तारीख : गुरुवार, ऑगस्ट १५
वेळ : १२.३० AM/IST (मध्यरात्री)  

हा खेळ भारतीय वेळेनुसार आज रात्री १२.३० वाजता सुरू होईल, याचा अर्थ युनायटेड किंगडममध्ये रात्री 8 वाजता आणि अमेरिकेत संध्याकाळी 3 वाजता याचे थेट प्रक्षेपण होईल.  

लिव्हरपूलच्या प्रीमियर लीग सीझनची सुरुवात नॉर्विचविरुद्ध विजयानंतर गोड झाली आहे तर चेल्सीला मँचेस्टर युनायटेड विरुद्ध मोसमातील सलामीच्या लढतीतच ४-० असा पराभवाचा धक्का बसला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News