महागलेल्या डिझेलला स्वस्त पर्याय झाला उपलब्ध 

परशुराम कोकणे
Tuesday, 2 July 2019
  • सोलापुरात उपलब्ध झाले इको फ्रेंडली डिझेल!
  • ​फुलांपासून बनविल्याचा विक्रेत्यांचा दावा; नियमित डिझेलपेक्षा स्वस्त 
  • वाहनांमुळे वाढलेल्या प्रदूषणावर उपाय म्हणून आता वनस्पतीपासून बनवलेले इको फ्रेंडली डिझेल बाजारात उपलब्ध

सोलापूर: वाहनांमुळे वाढलेल्या प्रदूषणावर उपाय म्हणून आता वनस्पतीपासून बनवलेले इको फ्रेंडली डिझेल बाजारात उपलब्ध झाले आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात इको फ्रेंडली डिझेलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

येथील एका कंपनीने सोलापुरात पहिल्यांदाच इको फ्रेंडली डिझेल उपलब्ध केल्याचा दावा करून विक्रीला सुरवात केली आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय जैविक इंधन धोरण 2018 ची पूर्तता या डिझेलमधून होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

सूर्यफूल, सोयाबीनपासून बनविलेले हे बायोडिझेल पंपावर मिळणाऱ्या पेट्रोल, डिझेलपेक्षा स्वस्त आहे. क्रूड डिझेलमधील सल्फर, लेड हे घातक पदार्थ इको फ्रेंडली डिझेलमध्ये नाहीत. लहान पाच लिटर पॅकमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. पंपावर जायची गरज नाही. या इको फ्रेंडली डिझेलमुळे वाहनामधून काळा धूर येत नाही. नियमित डिझेलसह मिश्रण करून देखील हे इको फ्रेंडली डिझेल वापरता येत आहे. नियमित डिझेलपेक्षा 10-15 टक्के अधिक मायलेज असल्याचा दावा विक्रेत्यांकडून केला जात आहे. 

 विक्रेत्यांचा दावा... 

  •  इंजिनचे आयुष्य वाढवते. इंजिनचे कंपन कमी करते. 
  •  सल्फर हा घातक पदार्थ नाही. कार्बन मोनॉक्‍साईड नाही 
  •  शंभर टक्के गुणवत्तेची हमी. सीलबंद पॅकिंग उपलब्ध. 
  •  नियमित डिझेलपेक्षा अधिक मायलेज 

जळगावमध्ये सूर्यफूल आणि सोयाबीनपासून इको डिझेल तयार करण्याची फॅक्‍टरी आहे. सोलापुरात पहिल्यांदाच पर्यावरणपूरक असे इको डिझेल उपलब्ध झाले असून पर्यावरणप्रेमींचा प्रतिसाद मिळत आहे. हे डिझेल वाहनांसोबत सर्व प्रकारच्या इंजिन, भट्टी, जनरेटरसाठी उपयुक्त आहे. 63 रुपये प्रति लिटर दराने हे डिझेल उपलब्ध आहे. 

- आशुतोष डागा, इको डिझेल विक्रेते

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News