चव्हाण साहेब तुमचे २५ आमदार आता आमच्या संपर्कात!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019
  • गिरीश महाजन यांचा दावा; अशोक चव्‍हाण यांना प्रत्युत्तर

मुंबई - काँग्रेसचे २५ आमदार भाजपच्या संपर्कात असून, त्यांची नावे सांगितली तर अशोक चव्हाण यांना झोपही येणार नाही, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केल्यानंतर महाजन यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. चव्हाणांसोबत रात्रंदिवस फिरणारेच आम्हाला घ्या म्हणून फोन करत आहेत, असा दावा महाजनांनी केला.

लोक फोडण्याचे काम नाही; पण जे लोक आमच्याकडे येत आहेत, त्यांना घेण्याचे काम आम्ही करत आहोत. आचारसंहितेला फक्त तीन महिने आहेत. ही २०-२० ची मॅच असून, पुढचा काळ आमचाच आहे, असा विश्‍वास महाजनांनी व्यक्त केला. आमच्या संपर्कात कोण आहेत याची यादी मी अशोक चव्हाणांना सांगितली तर त्यांचे उजवे-डावेही त्यांच्यासोबत राहणार नाहीत. त्यांची नावे आता मी उघड करणार नाही, असे ते म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News