"ट्रायल रूम'मध्ये कपडे बदलत आहात ?...सावधान !!!

सकाळ (यिनबझ)
Saturday, 10 August 2019
  • छुप्या कॅमेऱ्यातून अश्‍लिल व्हिडीओ
  •  सीताबर्डीतील कापड दुकानदारावर गुन्हा 

नागपूर : युवतींनो कपड्याच्या दुकानात, मॉल किंवा शोरूममध्ये कपडे खरेदी केल्यानंतर ट्रायल रूममध्ये जर कपडे बदलत असाल तर सावधान...कपडे बदलतानाचे अश्‍लिल व्हिडीओ बनण्यासाठी दुकानदार नोकराच्या मदतीने छुपे कॅमेरे बसवितायेत.

त्यानंतर हेच दुकानदार आणि नोकर मोठ्या चविने एकमेकांना शेअर करीत पाहतात. असाच एक प्रकार सीताबर्डीतील एका कपड्याच्या दुकानात उघडकीस आला. या प्रकरणी तरूणीच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी दुकानाचा मालक आणि नोकरावर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी तरूणीच्या तक्रारीवरून दुकानाचा मालक किसन इंदरचंद अग्रवाल (वय 54, रा. प्लॉट 79, वर्धमान नगर) आणि नोकर निखिल उर्फ पिंटू दिपक चौथमल (वय 27, रा. शितला माता मंदिरजवळ, पाचपावली) अशी आरोपींची नावे आहेत. दोघांनाही पोलिसांनी अटक केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News